Home latest News बामणी प्रोटीन्सच्या कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच • कंपनी व्यवस्थापनावर बेरोजगार कर्मचाऱ्यांचा...

बामणी प्रोटीन्सच्या कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच • कंपनी व्यवस्थापनावर बेरोजगार कर्मचाऱ्यांचा रोष कायम

82

बामणी प्रोटीन्सच्या कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच

• कंपनी व्यवस्थापनावर बेरोजगार कर्मचाऱ्यांचा रोष कायम

बामणी प्रोटीन्सच्या कामगारांचे धरणे आंदोलन सुरूच • कंपनी व्यवस्थापनावर बेरोजगार कर्मचाऱ्यांचा रोष कायम

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351

बल्लारपूर : 26 मे
तालुक्यातील बामणी प्रोटिन्स लिमि. कंपनी बंद करण्याचा निर्णय कंपनी व्यवस्थापनाने घेतल्याने येथील कामगार बेरोजगार झाले आहे. या विरोधात कामगारांनी रविवार, 19 मे पासून सुरू असलेले बेमुद्त धरणे आंदोलन सात दिवसानंतरही कायम राखले आहे.

बामणी प्रोटीन्स कंपनीतून दूषित पाणी भागर्थी नाल्याच्या माध्यमातून वर्धा नदीत सोडल्या जात होते. या दूषित पाण्यामुळे नदीचे पाणी दूषित होऊन मानवी आरोग्य, जलचर तसेच अन्य प्राणी जिवांवर गंभीर परिणाम होत होता. त्यामुळे पाणी शुध्द करावे मग ते नाल्यात सोडावे असे आदेश प्रदूषण नियामक मंडळाने कंपनी व्यवस्थापनाला दिले होते. यासाठी पुरेसा वेळही उद्योग व्यवस्थापनाला देण्यात आला होता. मात्र, व्यवस्थापनाने सरळ कंपनीच बंद केली. परिणामी येथे काम करणारे २२३ कामगार बेरोजगार झाले आहे. त्यामुळे या कामगारांसमोर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व कामगारांनी आता धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंपनी व्यवस्थापनाचे प्रदूषण नियामक मंडळाने दिलेले आदेश पाळावेत यासाठी कंपनीला पुरेसा वेळ. दिला असतानाही नियम न पाळता कंपनी बंद करणे हा कामगारांवर अन्याय आहे. कामगारांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा विचार करता कंपनी व्यवसस्थापनाने कामगारांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे कामगारांचे म्हणणे आहे.