वाघाच्या हल्ल्यात इसमाचा मृत्यू

🖋️ मीडिया वार्ता वृत्तसेवा
📱 8830857351
सिंदेवाही : 26 मे
तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेलेल्या 48 वर्षीय इसमावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना रविवार, 26 मे रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास कारघाटा कक्ष क्रमांक 257 मध्ये घडली. प्रभाकर अंबादास वेठे असे मृतकाचे नाव आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम नसते. तेंदूपत्ता हंगामातून ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार प्राप्त होतो. सद्या ग्रामीण भागात सर्वत्र हा हंगाम सुरू आहे. सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी प्रभाकर वेठे गावातील अन्य नागरिकांसोबत तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेला. तेंदूपत्ता संकलन करीत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्या नरडीचा घोट घेतला. माहिती मिळताच वनाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. मृताच्या वारसास तातडीची आर्थिक मदत देण्यात आली.








