Home विदर्भ चंद्रपूर जळगावातल्या तरुणाची चंद्रपूरात हत्या!

जळगावातल्या तरुणाची चंद्रपूरात हत्या!

101

 हॅलो…भाऊ मला हे लोक मारताय’; रडत रडत शेवटचा फोन भावाला

🖋️ मीडियावार्ता वृत्तसेवा

चंद्रपूर, 31 ऑक्टोबर
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच जळगांव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यामधील एका तरुणाची चंद्रपूरमध्ये हत्या करण्यात आली आहे. त्याने शेवटचा फोन आपल्या भावाला केला होता.

कीजळगावमधील अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील प्रफुल प्रकाश भदाणे (वय 35) याचा मृतदेह संशयितरित्या चंद्रपूर जिल्ह्यात आढळून आल्यानं त्याची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रफुल भदाणे हा 22 ऑक्टोबर रोजी एका वाहनावर चालक म्हणून गेलेला होता. 24 ऑक्टोबर रोजी प्रफुल चंद्रपूरच्या हद्दीत खांबाडा येथे जेवायला थांबला होता. काही वेळानंतर प्रफुलने त्याचा भाऊ प्रदीप प्रकाश भदाणे याला फोन आला की, ‘काही लोकं मला मारत आहेत आणि मी पळत आहे’. प्रदीपने आपल्या भावाला म्हणजे प्रफुलला त्या मारणाऱ्या व्यक्तींजवळ फोन द्यायला सांगितला. प्रदीपने त्यांना विनंती केली की, ‘मी पैसे पाठवून देईन तुम्ही प्रफुलला दवाखान्यात दाखल करा’. त्यांनी हो म्हटलं आणि फोन बंद पडला.

• भावाच्या अंगावर मारहाणीच्या जखमा

दोन तीन दिवस वाट पाहूनही भाऊ आला नाही आणि फोनही लागत नाही, म्हणून प्रदीप अमळनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची खबर द्यायला गेला. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना कळताच त्यांनी तातडीने बंद मोबाइलचं लोकेशन काढून त्या भागातील पोलीस स्टेशनला संपर्क साधला असता एक अनोळखी इसम मृत अवस्थेत आढळून आल्याचं सांगण्यात आलं. तिकडच्या पोलिसांनी काही फोटो पाठवले असता मयत इसम प्रफुल असल्याचं निष्पन्न झालं. प्रफुलच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आढळून आल्या आहेत.

• मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक रवाना

प्रफुलचा मारहाणीत मृत्यू झाल्याचा संशय त्याच्या भावाने व्यक्त केला आहे. त्यामुळे प्रफुलची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेथील अधिकाऱ्यांनी वरोरा पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पोलीस पुढील तपास करीत आहेत.