Home latest News चालत्या दुचाकीवर जिवंत सापासह तरुणांचा जीवघेणा स्टंट

चालत्या दुचाकीवर जिवंत सापासह तरुणांचा जीवघेणा स्टंट

102

चालत्या दुचाकीवर जिवंत सापासह तरुणांचा जीवघेणा स्टंट

त्रिशा राऊत

नागपूर क्राईम रिपोर्टर

मो: 9096817953

नागपूर: नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या एक तरुण स्कूटी चालवत आहे आणि त्याच्या गळ्यात जिवंत साप गुंडाळलेला दिसत आहे.तो एका हाताने स्कूटी चालवत असून दुसऱ्या हाताने सतत त्या सापाला कुरवाळत आहे आणि त्याला चुंबन घेत आहे. हा व्हिडिओ नागपूरच्या अवस्थी चौक परिसरातील असल्याचे सांगितले जात असून, मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती मिळाली आहे.

व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते की तरुण निष्काळजीपणाने एकाच हाताने गाडीचा एक्सलेरेटर नियंत्रित करत आहे, तर त्याच्या गळ्यात साप घट्ट गुंडाळलेला आहे. स्कूटीवर त्या तरुणासोबत आणखी एक मित्र मागे बसलेला आहे. हा तरुण रस्त्यावर चालत्या गाडीतून हा धोकादायक स्टंट करताना सापाला वारंवार चुंबन करताना आणि मागे चाललेल्या लोकांकडे काहीतरी ओरडताना दिसतो.

हा प्रकार केवळ त्या तरुणासाठी आणि सापासाठीच नव्हे, तर रस्त्यावरून जाणाऱ्या इतर वाहनचालकांसाठीही मोठा धोका निर्माण करणारा होता. या प्रकारामुळे रस्त्यावर लोकांची गर्दी जमली आणि काहींनी हा प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत केला.