Home latest News गाणी येथे सखी जल्लोष कार्यक्रम उत्साहात संपन्न*

गाणी येथे सखी जल्लोष कार्यक्रम उत्साहात संपन्न*

65

*गाणी येथे सखी जल्लोष कार्यक्रम उत्साहात संपन्न*

म्हसळा: संतोष उध्दरकर.

म्हसळा:ग्रुप ग्रामपंचायत गाणी व दि प्राईड इंडिया संस्था आणि महानगर गॅस लिमिटेड यांच्यावतीने सखी जल्लोष कार्यक्रम दिनांक ६ नोव्हेंबर २०२ ५ रोजी गाणी येथे उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकातील कांचन जवान ऋतुजा शिरतोडे,प्रतीक्षा कानवडे, गौरी शिंदे,यांची विशेष उपस्थिती राहिली. गाणी ग्रामपंचायतीचे सरपंच आदित्य कासरुंग यांनी सखी जल्लोष कार्यक्रम हा महिलांच्या धावपळीतून आनंद शोधण्याचा मार्ग असल्याचे प्रतिपादन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान व आदिशक्ती अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे विशेष महत्त्व लक्षात घेऊन दामिनी पथकातील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलांना स्व सुरक्षितता, स्वसंरक्षण, महिलांची जबाबदारी, महिलांचे पुरुषांबरोबर असणारे समान स्थान या गोष्टींवर विशेष मार्गदर्शन केले.
दि प्राइड इंडिया संस्थेचे तालुका प्रकल्प समन्वयक किशोर शितोळे सर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करून वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमातून सर्वांचा आनंद द्विगुणित केला. विजेत्यांना स्मार्ट वॉच, सोलर लॅम्प, थर्मास वॉटर बॉटल देण्यात आले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमेश धाडवे, उपसरपंच सुभाष उजळ, सुदाम शेडगे, आत्माराम रहाटवल, दि प्राईड इंडिया संस्थेतील राज कावनकर, आर्यन येलवे व तालुक्यातील सर्व समन्वयक उपस्थित होते.