Home latest News लहूकन्या कुमारी तनुजा नारायण साळुंके नीट परीक्षा उत्तीर्ण

लहूकन्या कुमारी तनुजा नारायण साळुंके नीट परीक्षा उत्तीर्ण

328

या मातंग समाजाच्या मुलीने सर्व स्तरावरून कौतुक

समाधान सरोदे 

दैनिक मीडिया प्रतिनिधी

धाराशिव: मराठवाड्यामध्ये हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा नीट ची परीक्षा होतकरू हुशार व गरीब असणाऱ्या विद्यार्थ्यांनी पास केल्याचे आपण बऱ्याच बातम्या न्युज वाचले आहेत परंतु धाराशिव जिल्ह्यातील तेर येथील मातंग समाजातील लहूकन्या कुमारी तनुजा नारायण साळुंके हिने आई-वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीचे व गरीब असून वडील अपंग आहेत आई इतर तर काम करून मुलीच्या शिक्षणाचा खर्च ते करत होते यासाठी मुलीच्या शिक्षणासाठी आई-वडिलांचे कष्ट पाहता मुलींनीही त्यांच्या कष्टाची व गरिबीची जाण ठेवत आज नावलौकिक केला आहे.

2025 च्या नीट परीक्षा तनुजा ने उत्तीर्ण होऊन डॉक्टर की साठी ती पात्र झाल्याबद्दल तेर मधील व तेर परिसरातील मातंग समाजाच्या मुलीने कौतुकास्पद कामगिरी शैक्षणिक मध्ये केल्याबद्दल तिचे तेर चे नागरिक व समाज बांधवांनी तिचा अतोनात सत्कार केला आहे त्यामध्ये समाधान सरवदे पत्रकार बहुजन स्वाभिमान संघटना धाराशिव तालुका अध्यक्ष अमोल कसबे तेर ग्रा.प सदस्य विनोद कांबळे सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्र परिवाराच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला असून तनुजाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तिचे कौतुक करण्यात आले.

या गोष्टीबद्दल तनुजाच्या आई-वडिलांना मुलीच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिमान असल्याचे आई वडिलांचे म्हणणे असून अशा गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मनापासून दैनिक मीडिया वार्ता परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा शुभेच्छुक दैनिक मीडिया वार्ता न्यूज व सर्व दैनिक मीडियाच्या पत्रकार बांधवाकडून अभिनंदन करण्यात आले.