Home latest News पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या परत

पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या परत

68

पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू मिळाल्या परत

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी

पनवेल : पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू परत मिळाल्याची घटना पनवेल मध्ये घडली आहे .
पनवेल शहर वाहतूक विभागात पनवेल रेल्वे स्टेशन ( पश्चिम ) परिसरात वाहतूक नियमन करीत असताना श्रीमती.रिंकू प्रजापती राहणार भाईंदर या त्यांच्या करंजाडे येथील नातेवाईकाकडे जात असता त्यांची बॅग व त्यातील मौल्यवान वस्तू रिक्षामध्ये गहाळ झाल्याचे लक्षात आले, त्यांनी रेल्वे स्टेशन परिसरात रिक्षा चालकाचा शोध घेतला असता, रिक्षाचालक त्यांना सापडला नाही.
अशात कर्तव्यावर असणाऱ्या वाहतूक अधिकारी व कर्मचारी यांनी तातडीने हालचाल करून सदर महिलेने केलेल्या मोबाईल द्वारे ऑनलाइन पेमेंट ट्रान्सफर केलेल्या माहितीच्या आधारे सदरचे पैसे कोणाला पाठवले आहेत त्या रिक्षाचालकाचा सोशल मीडियाचा वापर व रेल्वे स्टेशन परिसरात विचारपूस करून शोध घेतला व रिक्षा चालकाकडून श्रीमती रिंकू प्रजापती व त्यांच्या मुलगा यांच्याकडे त्यांची हरवलेली बॅग व मौल्यवान वस्तू त्यांच्या ताब्यात देण्यात आल्या.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक (पनवेल शहर वाहतूक) औदुंबर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पो.हवा युवराज येळे, पो. हवा आमीर मुलाणी आदी सदर ठिकाणी कार्यरत होते.
प्रजापती कुटुंबियांनी पनवेल शहर वाहतूक पोलिसांचे व रिक्षा चालकाचे आभार व समाधान व्यक्त केले .