Home latest News शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे यतीन देशमुख पनवेल म.पा.प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक...

शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे यतीन देशमुख पनवेल म.पा.प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक

172

शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे यतीन देशमुख
पनवेल म.पा.प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नवीन पनवेल शहर प्रमुख यतीन देशमुख पनवेल महानगर पालिकेच्या प्रभाग १६ मधून महाविकास आघाडीतून निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असून ते निवडणुकीला उभे राहिल्यास महायुतीच्या प्रस्थापित नगरसेवकांना प्रभाग १६ मधून तगडे आवाहन उभे राहणार आहे.
यतीन देशमुख हे पनवेल महापालिकेच्या २०१७ सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे होते, मात्र त्यांचा निसटता पराभव झाला. तरी देखील यतीन देशमुख हे मागे हटले नाहीत. गेल्या ८ वर्षात त्यांनी आपला जनमानसात आधार आणखी वाढवला आहे. यतीन देशमुख वेगवेगळ्या मुद्द्यांवर विरोधकांना धारेवर धरत महाविकास आघाडीचा पर्याय जनतेसमोर घेऊन जात आहे. सत्ताधाऱ्यांनी आपली एकाधिकार शाहीमुळे विरोधकही त्यांच्यामागे गेले. मात्र यतीन देशमुख यांनी ठोसपणे विरोधकांची भूमिका निभावत महाविकास आघाडीद्वारे सत्ताधाऱ्यांची वेगवेगळ्या प्रश्न मांडून वेळप्रसंगी आंदोलन उभारून कोंडी केली. सध्या पनवेल महापालिकेत अपुरा
पाणी पुरवठा, खराब रस्ते, वाढीव मालमत्ता कर, वाहतुक कोंडी, वाहन पार्किंगसाठी अपुरी सुविधा, १५ वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित बस डेपोचे सुधारीकरण, झोपडपट्टी पुनर्वसन, फुटपाथ वरील अतिक्रमण, महापालिकेत जोडलेल्या गावांचे मूलभूत सुविधा, भ्रष्टाचार असे विविध प्रश्न आ वासून उभे आहेत. मात्र ठोस विरोधक नसल्यामुळे ते प्रश्न सुटत नाही. तसेच राज्यात झालेल्या मराठा समाजाच्या आंदोलनात त्यांनी अग्रेसर राहून सहभाग नोंदवला. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीसाठी यंदा यतीन देशमुख उभे राहिल्यास महायुतीला प्रभाग १६ मध्ये तगडे आवाहन उभे राहणार आहे.