Home latest News स्मार्ट मिटर बसविणे बंद करा अन्यथा तिव्र आंदोलन…म्हसळा संघर्ष समितीचा महावितरणाला ईशारा…
स्मार्ट मिटर बसविणे बंद करा अन्यथा तिव्र आंदोलन…म्हसळा संघर्ष समितीचा महावितरणाला ईशारा…
म्हसळा: संतोष उध्दरकर.
म्हसळा: दि. २१ नोव्हे रोजी म्हसळा संघर्ष समिती च्या वतीने म्हसळा महावितरणाला स्मार्ट मिटर बसवु नका या संदर्भात निवेदन देऊन विनंती करण्यात आली. काही महिन्यापूर्वी देखील याच समिती कडुन स्मार्ट मिटर बसवु नये या विषयाचे पत्रक देण्यात आले होते पण त्या पत्रकाचे महावितरणा कडुन केराची टोपली दाखविली व आपला मनमानी कारभार सूरु ठेऊन ग्राहकांची फसवणुक करण्यात आली आहे असे समिती कडुन थेट आरोप करण्यात आले, त्याच संदर्भात पुन्हा एकदा महावितरणाला पत्रक देऊन स्मार्ट मिटर न बसविण्याचे सांगण्यात आले आहे तसेच जर का पंधरा दिवसाच्या आत हे काम थांबविण्यात नाही आले तर तिव्र आंदोलनचा इशारा देण्यात आला असल्याचे समितीचे सल्लागार संतोष पाटील यांनी प्रसार माध्यम यांच्या जवळ बोलतांना स्पष्ट केले. यावेळी समिती अध्यक्ष समीर काळोखे, सल्लागार संतोष पाटील, नईम दळवी, सुरेश कुडेकर, नगरसेवक सुनिल शेडगे, प्रकाश घाणेकर, सुमित सावंत, अशोक पाटील, सलाऊद्दीन घराडे, नजीर जहाँगीर, प्रविण बनकर, राजु लाड, अनंत रिकामे तसेच तालुक्यातुन असंख्य ग्राहक उपस्थित होते.
———————=————–
जुने मिटर सुस्थितीत असुन देखील ग्राहकांना न विचारता स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत, त्यामुळे ग्राहकांना वारेमाप विज बिल येत असून आर्थिक भुदंड सोसावा लागत आहे,जर का स्मार्ट मिटर बसविणे थांबविले नाही..तर होणाऱ्या परिणामांना महावितरणाने सामोरे जावे.
संतोष पाटील.
समिती सल्लागार.
————————————-
आम्ही केंद्र शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे चालत आहोत, आणि जे मिटर बंद स्वरूपात आहेत आणि त्यांना एव्हरेज बिल येत आहे तेच मिटर आम्ही काढुन त्या ठिकाणी स्मार्ट मिटर बसविण्यात येत आहेत. आणि जो मिटर सुस्थितीत आहेत ते मिटर आम्ही कढत नाही.
पालशेकर
अभियंता, विदयुत महावितरण, म्हसळा