शिवसेना शिंदे गटात उभी फुट..
तालुका प्रमुखांसह असंख्य कार्यकर्ते खासदार सुनील तटकरे यांच्या सोबत…!!
आमचे नगरसेवक गेले आम्ही पुर्ण शिवसेनाच घेतली… राष्ट्रवादीचा सुर
म्हसळा: संतोष उद्धरकर.
म्हसळा: म्हसळा तालुक्याचे राजकारण दिवसेंदिवस वेगळे वळण घेत असुन सामान्य कार्यकर्ता यामुळे संभ्रमात पडला असल्याचे दिसुन येत आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुका जवळ येत असल्याने म्हसळ्याचे राजकारण दिवसंदिवस तापत चालले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने म्हसळा नगरपंचायतचे राष्ट्रवादीचे नगराध्यक्षासह काही नगरसेवक यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश घेऊन राष्ट्रवादी पक्षाला ( अजित पवार ) यांना एक प्रकारे आव्हान केल्याने राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांनी म्हसळा शिवसेना शिंदे गटात उभी फुट पाडुन तालुका प्रमुखासह असंख्य कार्यकर्ते यांना आपल्या कडे आणण्यात यशस्वी खेळी करून एकप्रकारची गुगलीच टाकली आहे.
एकंदरीत म्हसळ्याचे राजकारण तापत चालले असून यामध्ये सामान्य कार्यकर्ता, सामान्य जनता मध्ये संभ्रम निर्माण होऊन कोणत्याच पक्षात निष्ठावंत कार्यकर्ता राहिला नसल्याचे बोलले जात आहे.
येणाऱ्या निवडणुकित जनता कुणाला स्विकारणार ते पहावे लागेल.. एकंदरीत महाराष्ट्राचे राजकारण म्हसळा ठरविणार कि काय.. असे बोलले तर वावगे ठरणार नाही.
राष्ट्रवादी कॉंग्रेस खासदार सुनिल तटकरे, मंत्री आदिती ताई याचे नेतृत्व स्विकारून प्रमुख उपस्थितीत प्रवेश केलेले शिवसैनिक.
म्हसळा तालुका प्रमुख प्रसाद बोर्ले, युवा प्रमुख स्वप्नील चांदोरकर, साळविंडे विभाग प्रमुख नामदेव घुमकर,माजी सरपंच रामचंद्र बोर्लै,केलटे माजी अध्यक्ष गणपत सावंत,हरी नाक्ती,शहर प्रमुख पवन भोई,तालुका महिला संघटक गौरी करडे,म्हसळा महिला शहर प्रमुख नेहा पाटुकले,महिला उपशहर प्रमुख सौ संगीता सूर्यवंशी, सौ रिना घुमकर, यांच्या सह केलटे, तोंडसुरे गावातील अनेक पदाधिकारी,व शेकडो कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहिर पक्ष प्रवेश केला.