Home latest News म्हसळा नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच.. मंत्री भरतशेठ गोगावले यांचा निर्धार..!

म्हसळा नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच.. मंत्री भरतशेठ गोगावले यांचा निर्धार..!

92

म्हसळा नगरपंचायतवर शिवसेनेचा भगवा फडकवणारच.. मंत्री भरतशेठ गोगावले यांचा निर्धार..!

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा:दि. २४ नोव्हे रोजी रोजगार हमी तथा फलोत्पादन खारभुमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांचा रायगड जिल्हा दौरा दरम्यान म्हसळा शासकीय विश्राम गृहात म्हसळा नगरपंचायत आढावा बैठक घेऊन मुख्याधिकरी यांच्या कडुन आढावा घेण्यात आला, या वेळी म्हसळा तालुका शिवसेनेच्या वतीने मंत्री भरतशेठ गोगावले यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले, यावेळी जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, शिवसेना नेते रविंद्र लाड, श्रीवर्धन संपर्क प्रमुख सचिन पाटेकर, म्हसळा उपतालुका प्रमुख प्रविण बनकर, अमोल पेंढारी, जयेश जाधव, अरविंद शिंदे, मनोज निगुडकर, तळा तालुका प्रमुख प्रद्युम्न ठसाळ, तळा शहर प्रमुख वडके, रितेश मुंडे, युवा सेना जिल्हा प्रमुख बिपीन उभारे, तसेच शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते, महिला वर्ग उपस्थित होते, या वेळी बोलतांना सांगितले कि जे म्हसळा तालुका प्रमुखा सह पदाधिकारी इतर पक्षात गेले आहेत ते मनाने आमचे कधीच नव्हते, जे गेले आहेत ते निश्चक्रीय लोक होती तेच गेली आहेत,ते तळ्यात मळ्यात होते, लवकरच म्हसळा तालुका प्रमुखासह नविन कार्यकारीणी जाहिर करु व येणाऱ्या निवडणुकीत आम्ही जोमाने काम करू तसेच विकासात्मक दृष्टीने श्रीवर्धन, म्हसळा येथे नक्कीच परिवर्तन करणार असे मंत्री भरत शेठ गोगावले यांनी विश्वास व्यक्त करून काही दिवसात म्हसळा नगरपंचायतवर शिवसेनेचाच भगवा फडकविणार असा भरतशेठ यांनी निर्धार व्यक्त केला. तसेच श्रीवर्धन म्हसळा आमचाच आहे अशी मक्तेदारी सांगत होते त्यांना म्हसळा शिवसैनिकांनी मोडीत काढली आहे असा भरतशेठ यांनी नाव न घेता विरोधकांना टोला देखील मारण्यात आला.भरतशेठ यांनी खूप मोठे पाऊल उचलुन आपण म्हसळा काबिज करून येणाऱ्या काही दिवसात म्हसळा नगरपंचायत आपली असेल असे जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी सांगितले.