Home latest News मुरुडेश्वर विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरि निर्वाण दिनानिमित्त...

मुरुडेश्वर विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरि निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

479

मुरुडेश्वर विद्यालय येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ वा महापरि निर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

दत्ता गोरे 

मुरुड: मुरुडेश्वर माध्यमिक विद्यालय मुरुड तालुका लातूर येथे महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसंगी संस्था सचिव मा.बाळासाहेब डोंगरे, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री उद्धव फेरे,कौशल्या सवासे, बनसोडे राहुल,पटणे आत्मलिंग,शितल सहालुगडे, विकास गायकवाड,आश्विन खराडे,राजेंद्र गिरी,विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

 

बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर इतिहास विभाग प्रमुख सवासे कौशल्या मंँडम यांनी बाबासाहेबांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकताना भारतीय कायदा पंडित,अर्थशास्त्रज्ञ, न्याय शास्त्रज्ञ,अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी,थोर तत्त्वज्ञ, समाजसुधारक,दलितांच्या उद्धारासाठी कार्य करणारे, संविधानाचे शिल्पकार, मसुदा समितीचे अध्यक्ष व राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा आढावा घेतला .शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मुल मंत्र बाबासाहेबांनी दिला.

.बनसोडे राहुल सर यांनी सुत्र संचालन केले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनात घडलेल्या घटनांचा आढावा घेतला.तर आभारप्रदर्शन शितल सहालुगडे यांनी मानले.कार्यकर्माची सांगता संविधान वाचनाने केली.