Home latest News देशातील वाढते प्रदूषण रोखणे काळाची गरज: कठोर उपाय योजना कराव्यात – खासदार...

देशातील वाढते प्रदूषण रोखणे काळाची गरज: कठोर उपाय योजना कराव्यात – खासदार श्रीमती फौजिया खान 

92

खासदार श्रीमती फौजिया खान यांचे राज्यसभेतील मागणी

सदाशिव राऊत

परभणी देशभरातील वाढत्या वायू आणि जल प्रदूषणाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत असून त्यामुळे संपूर्ण सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रात अक्षरश: आणीबाणी सारखी स्थिती आल्याची परिस्थिती आहे.

त्या आपत्कालीन स्थितीत हे प्रदूषण रोखण्यासाठी केंद्र शासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या खासदार श्रीमती फौजीया खान यांनी राज्यसभेत केली.

प्रदूषण हा केवळ पर्यावरण मुद्दा नाही प्रदूषणाने संपूर्ण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थाच दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. आरोग्याच्या क्षेत्रात प्रदूषणाने अक्षरशः आणीबाणी सारखी परिस्थिती आणली आहे. जीव धोक्यात घालणाऱ्या धोक्याच्या मर्यादेपर्यंत प्रदूषणाची पातळी नियमितपणे पोहोचत आहे असे असताना आपण उदासीनता सहन करू शकत नाही. असे स्पष्ट करीत श्रीमती खान यांनी प्रदूषणाच्या आपत्कालीन स्थितीत त्वरित कठोर उपाययोजना अवलंबाव्यात त्यासाठी उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध कठोर दंड ही आकारले जावेत.

श्रीमती खान यांनी सरकारने या दृष्टीने जलद गतीने व एक समानपणे उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली. पर्यावरणीय नियमांच्या केंद्रस्थानी असलेले प्रदूषण ,नियंत्रण मंडळे, त्याची विश्वासहर्ता आणि त्याचा वैज्ञानिक आदेशाची पूर्तता करण्याची क्षमता कमी असणाऱ्या प्रणाली भ्रष्टाचाराने अक्षरशः पोखरल्या आहेत असे त्या म्हणाल्या आणि प्रचंड भ्रष्टाचार यावर प्रखर टीका टिपणी करतेवेळी केवळ राष्ट्रगीते गाऊन राष्ट्रभक्ती व्यक्त होऊ शकत नाही. तर व्यवहारात मात्र मातृभूमीच्या सर्वार्थाने रक्षणाकरता नागरिकां च्या वतीने प्रणाली सुधारली पाहिजे जबाबदारीने कामे केली पाहिजे असेही त्यांनी विषद केले.