Home latest News केज शहरातील विविध महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृतीसाठी रॅली

केज शहरातील विविध महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृतीसाठी रॅली

81

केज शहरातील विविध महाविद्यालयाच्या वतीने एड्स जनजागृतीसाठी रॅली

केज/प्रतिनिधी: दि.1डिसेंबर राष्ट्रीय एडस दिनानिमित्त दि.9 डिसेंबर 2025 रोजी वसंतफार्मसी कॉलेज केज,कमल नर्सिंग कॉलेज केज,उप-जिल्हा रुग्णालय केज यांच्या संयुक्त विद्यमाने केज शहरामध्ये एड्स जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.रॅलीची सुरुवात वसंत फार्मसी कॉलेज केज येथून बाबुरावजी आडसकर महाविद्यालया चे प्राचार्य डॉ.श्री.फावडे सर यांच्या हस्ते फीत कापून रॅलीला सुरुवात करण्यात आली या मध्ये उपस्थित सर्व विध्यार्थीनी हातामध्ये जनजागृतीच्या घोष वाक्याचे फलक घेऊन घोषणा देत केज शहर दनाणुन सोडले होते या मध्ये जोश पूर्ण घोषणा देत रॅली कानडी रोड मार्गे बसस्थानक ते तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन समारोप करण्यात आला.

यावेळी नायब तहसीलदार श्री.भंडारी साहेब,रोटरी क्लब ऑफ केजचे श्री.हनुमंत भोसले सर,प्राचार्य डॉ.श्री.हनुमंत सौदागर सर,प्राचार्य श्री. अविनाश थळकरी सर, समुपदेशक सौ.साकसमुद्रे मॅडम उपस्थित होते. समारोपाच्या वेळी उपस्थित विध्यार्थीना नायब तहसीलदार श्री. भंडारी सर यांनी मार्गदर्शन करून कौतुक केले व चांगल्या कार्या बद्दल शुभेच्छा दिल्या.हा कार्यक्रम यशस्वी करण्या साठी समन्वयक प्रा. महादेव लांडगे यांच्यासह प्रा.राम चौरे,प्रा.कांबळे सतीश,प्रा.राऊत अभिजित,प्रा.सावरे धनराज,प्रा.सौ.रसाळ मनीषा,प्रा.सौ.प्रतीक्षा कोरे,प्रा.प्रणिता चौरे,प्रा. कोपले अंबिका,प्रा.दांगट स्नेहल,शेख सद्दाम,शेख मोहसीन,खयामोद्दीन शेख,कांबळे अशोक आदींनी परिश्रम घेतले.