Home E-Paper ४० दिवस होऊनही चोरी प्रकरणाचा अद्याप झाला नाही उलगडा?

४० दिवस होऊनही चोरी प्रकरणाचा अद्याप झाला नाही उलगडा?

380

कामोठे येथील सविता म्हस्कर यांचे तब्बल २५ लाख रुपये किंमतीचे सोने लंपास 

 

कृष्णा गायकवाड 

तालुका प्रतिनिधी 

9833534747

पनवेल/कामोठे: कामोठे परिसरातील प्रतिक जेम्स या गृह संकुलातील रहिवाशी सविता म्हस्कर यांच्या राहत्या घरातून तब्बल २५ लाख किंमती रुपयाचे सोने चोरांनी लंपास केल्याच्या घटनेला ४० दिवस उलटूनही कामोठे पोलिस अद्याप चोराच्या शोधतच आहेत, असा आरोप सविता म्हस्कर आणि कुटुंबांनी केला आहे.

आज दि.१ नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत सविता म्हस्कर यांनी म्हस्कर कुटुंबाला कशा प्रकारे त्रस्त झालो आहेत याचा सविस्तर माहिती दिली असता, चोरी प्रकरण तपास अधिकारी प्रतापसिंग चव्हाण संशयित आरोपीस तपासणी करण्या ऐवजी आमचीच उलट तपासणी करत असल्याचं त्यांनी सांगितलं. सविता म्हस्कर यांच्या पतींना ह्या प्रकरणाच्या धक्क्याने अतिदक्षात विभागत दाखल करावे लागलं होत. “माझ्या पतीच्या दोन्ही किडनी निकामी असून अशा प्रकारे होणाऱ्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब मानसिकरित्या खचले असून, आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा ” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुलगा चेतन म्हसकर यांना अज्ञात व्यक्तीचा व्हाट्सअपद्वारे फोन करून संशयित आरोपी यांनी ५ लाख रुपयांत तोडगा (सेटलमेंट ) केली असल्याचं सांगून त्यामुळे तपासामध्ये दिरंगाई होत आहे, असं फोन वरून सांगितलं. याबाबत पोलिसांना सर्व माहिती दिली असता त्यावरूनही त्यांचे तपासाबाबत हलगर्जीपणा दिसून येत असल्याचं तक्रार म्हस्कर कुटुंबीयांनी केला आहे.

तपास अधिकारी संशयित आरोपीस पाठीशी घालत असल्याचं दिसून येत असून आम्हाला हा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात यावा अशी विनंती करून ,त्यांनी अर्ज दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास कामोठे पोलीस गुन्हे विभागातील पोलीस निरीक्षक मनोहर पगार करत आहेत.

“सदर गुन्ह्यातील तांत्रिक बाबी लक्षात घेऊन तपास सुरू आहे. कोणत्याही आरोपीला पाठीशी न घालता न्यायालयीन प्रक्रियेसाठी खटला मजबूतपणे दाखल करण्यासाठी पुरावे पूर्णपणे जमा करत आहोत. अज्ञात इसमाने केलेल्या फोन कॉलचा तपासही सायबर विभाग शोध घेत आहे. लवकरच आम्ही गुन्ह्याच्या मुळाशी पोहचू”.

मनोहर पगार

पोलीस निरीक्षक,

कामोठे पोलीस,गुन्हे विभाग.