ब्लू पॅन्थर्स संघटनेच्या वतीने मौल्यवान रत्नांचा सन्मान सोहळ्याचे आयोजन
आंबेडकरी चळवळीतील मौल्यवान रत्नांचा पुरस्काराने होणार गौरव

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747
पनवेल: रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2025 रोजी पनवेल मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे पनवेल तालुक्यातील मौल्यवान रत्नांचा सन्मान सोहळा तथा कर्तृत्ववान पत्रकारांचा गौरव सन्मान आयोजन ब्लू पँथर्स पनवेल , रायगड संघटनेच्या वतीने करण्यात आलेले आहे.
गेल्या दोन वर्षापासून ब्लू पॅंथर संघटनेच्या माध्यमातून पनवेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रम , गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा ,महापुरुषांच्या जयंती त्याचबरोबर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन, मार्गदर्शन शिबिरे इ. कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्याचाच एक भाग म्हणून येत्या रविवारी धम्मचक्र प्रवर्तन दिन व येवला मुक्ती दिनाचे औचित्य साधून पनवेल मधील कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तसेच साहित्य, पत्रकारिता व समाजसेवा या घटकांमध्ये अतिशय चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मौल्यवान रत्न नावाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे, पनवेल मधील बौद्ध समाजातील नामवंत पत्रकार तसेच चळवळीला पोषक असणारे कर्तुत्ववान पत्रकार यांचा सन्मान त्याचबरोबर पनवेल मधील गायन, वादन, संगीत क्षेत्रातील कलाकारांचा तसेच ज्यांनी आपापल्या परीने समाजसेवेला वाहून घेतले आहे अशा व्यक्तींचा देखील सन्मान करण्याचा आयोजन आहे.
तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ब्लू पॅंथर पनवेल, रायगड संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.








