Home महाराष्ट्र काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या `सुखकर्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन! व ‘दिवाळी पहाट’...

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या `सुखकर्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन! व ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन कैलास मानसरोवर यात्रेवर स्वानुभवाधारीत शिदोरी वाचकांना देणार..

116

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या `सुखकर्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन! व ‘दिवाळी पहाट’ चे आयोजन

कैलास मानसरोवर यात्रेवर स्वानुभवाधारीत शिदोरी वाचकांना देणार..

काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या `सुखकर्ता’ दिवाळी अंकाचे प्रकाशन! व 'दिवाळी पहाट’ चे आयोजन

कैलास मानसरोवर यात्रेवर स्वानुभवाधारीत शिदोरी वाचकांना देणार..

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

उलवे: आंतरराष्ट्रीय कामगार नेते
महेंद्रशेठ घरत आपल्या बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी ओळखले जातात. मानसरोवर यात्रे दरम्यान त्यांना आलेले स्वानुभव आणि सहकाऱ्यांचे अनुभव कथन करत दिवाळी अंकांचा साहित्यिक वारसा जपण्यासाठी यंदा ‘सुखकर्ता’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करत`दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
कामगार नेते महेंद्र घरत यांनी उलवे नोडमध्ये सर्वप्रथम `दिवाळी पहाट’ कार्यक्रमाला सुरुवात केली. ही परंपरा जपण्यासाठीच ‘यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्था’ आणि रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे शेलघर येथे सुमधुर गीतांचा कार्यक्रम मंगळवारी (ता.२१) सकाळी 7 वाजता आयोजित केला आहे. या ठिकाणी ‘इंडियन आयडाल’फेम सागर म्हात्रे, `होऊ दे धिंगाणा फेम’ विनल देशमुख, `सूर नवा ध्यास नवा फेम’ श्वेता म्हात्रे, तृप्ती दामले यांच्या बहारदार गायनाने `दिवाळी पहाट’ रंगणार आहे. विशेष म्हणजे`लास्ट स्टॉप खांदा’ या चित्रपटाची टीमही यावेळी उपस्थित राहणार आहे.
यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत कामगारांसाठी वर्षभरात केलेले करार आणि विविध कंपन्यांमधील बोनसचा आढावा घेतला जातो. ही प्रथा गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. शेलघर येथील स्व.जोमा नारायण घरत समाज मंदिर सभागृहात हा कार्यक्रम रंगणार असून
शेलघर येथील `यमुना सामाजिक, शैक्षणिक संस्थे’ची मोलाची भूमिका सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन महेंद्रशेठ घरत आणि सौ. शुभांगीताई घरत यांनी केले आहे.