Home अलिबाग ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात महिला व बाल विकास मंत्री आदिती...

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ; राजीप आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण

108

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ;

राजीप आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण

ग्रामपंचायतीमुळेच शासनाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचतात
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे ;

राजीप आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:
केंद्र व राज्य शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे महत्त्व काम ग्रामपंचायतीमार्फत होते. ग्रामपंचायत नसेल तर कुठलीही योजना प्रभावीपणे अमलात येऊ शकत नाही असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी केले.
रायगड जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श ग्रामसेवक पुरस्कार आणि गुणगौरव समारंभ क्षात्रौय समाज सभागृह , कुरूळ येथे उत्साहात पार पडला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे, प्रकल्प संचालक प्रियदर्शन मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. तब्बल नऊ वर्षांनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात एकूण 125 ग्रामसेवकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की नववर्षांनी या पुरस्कारांचे वितरण होत असल्याने प्रथम सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. ग्रामपंचायत ही ग्रामीण भागाच्या विकासाचा पाया आहे. तर ग्रामसेवक म्हणजे ग्रामस्थांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी शासनाच्या योजना सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा दुवा आहे. सध्या कार्यरत ग्रामसेवकांपैकी अनेक जणांकडे एकापेक्षा जास्त ग्रामपंचायतींचा अतिरिक्त भार आहे. पण तरीदेखील हे ग्रामसेवक प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत. ज्यांना पुरस्कार मिळाला आहे आता त्यांची जबाबदारी आणखी वाढली आहे. त्यामुळे सर्वांनी आणखी जोमाने काम करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की ग्रामसेवक हे प्रशासन आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे त्यांचा योग्य तो सन्मान झालाच पाहिजे. तब्बल नऊ वर्षानंतर या पुरस्कारांचे वितरण दिवाळीच्या मुहूर्तावर होत असल्याचे मी रायगड जिल्हा परिषद आणि पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन करतो.
“ग्रामसभा म्हंटली की गावकरी हजेरी लावतात कारण त्यांना माहित असते की गावाच्या समस्या सोडवणारा खरा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामपंचायत आणि त्याचे शिल्पकार म्हणजे ग्रामसेवक. मोठ्या लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकाचे काम अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरव होणे ही जबाबदारी अधिक वाढवणारी बाब आहे.
-आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री