राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि तुषारदादा पाटील युवा मंच महा. राज्य पुरस्कृत दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजन

कृष्णा गायकवाड
पनवेल( प्रतिनिधी ): राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) आणि तुषारदादा पाटील युवा मंच महा. राज्य पुरस्कृत दिवाळी पहाट कार्यक्रम दि. २० ऑक्टोबर रोजी, हिंदुस्थान बँक शेजारील मैदानावर सकाळी ७ ते १० या वेळेत आयोजन करण्यात आलं आहे, यंदा कळंबोली परिसरातील नागरिकांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार विजेते दांपत्य श्री. विशाल रसाळ व सौ. सोनल रसाळ यांच्या अभंग भावगीतांच्या गाण्यांचा सुरेल मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे. कळंबोली परिसरात सतीश पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)पनवेल महानगर क्षेत्र अध्यक्ष व ॲड.तुषार पाटील यांच्या यांच्या विद्यमाने आयोजीत करण्यात आलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या माध्यमातून क्षेत्रात अनेक समाजउपयोगी कार्यक्रम आयोजन होत असतात. यावर्षी सांस्कृतिक वारसा जपून तरुणाई अभंग आणि भावगीतांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध होणार. असं मतं आयोजकांनी यानिमित्ताने व्यक्त केलं.








