हिंगणघाट हाथरस मधिल घटनेचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध.

55

हाथरस मधिल घटनेचा वंचित बहुजन आघाडी तर्फे निषेध.


प्रशांत जगताप
हिंगणघाट:- उत्तरप्रदेश मधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार करून जीभ कापन्यात आली व येथील जातीयवादी सरकारच्या नाकर्तेपना मुळे तिला वेळेवर उपचार न मिळाल्याने या जातीयवादी व्यवस्थेचा मनीषा बली ठरली. या वृत्तिचा वंचित बहुजन आघाडी चे वतिने निषेध व्यक्त करीत सर्व अरोपिना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी हिंगणघाट येथे उप विभागीय अधिकारी साहेबा मार्फ़त मा. प्रधानमंत्री नवी दिल्ली यांना निवेदन पाठवींण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नेते डाॅ. उमेश वावरे, मनिष कांबळे, दिलिपभाऊ कहूरके, राजेश खानकूरे, चारू आटे, कमलाकर माडवकर, जिवन उरकुडे, प्रशांत शंभरकर, प्रणय पाटील, नुतन राठोड, प्रदीप डोळस, आकाश हेडाऊ, कार्यकर्ते उपस्थित होते.