आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून दीपोत्सव २०२५ दिवाळी संध्या कार्यक्रमाचे आयोजन.
सुश्राव्य संगीत मैफलीने पनवेल महानगरातील श्रोते होणार मंत्रमुग्ध

कृष्णा गायकवाड
पनवेल: भारतीय जनता पार्टी पनवेल आणि रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांचे आयोजन व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून संगीत संस्कृती आणि आनंदाचा उत्सव पनवेल महानगरातील श्रोत्यांनी अनुभवता येणार आहे. दरवर्षीच्या प्रमाणे यावर्षीही पनवेलकरांना सुरेल सुरांच्या मैफिलीचा आस्वाद घेता येणार आहे. महानगरातील पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे याठिकाणी दीप उत्सव २०२५ या कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आला आहे.
दि.१८ ऑक्टोबर खारघर, १९ ऑक्टोबर रोजी कळंबोली याठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि गायिका गुल सक्सेना यांचा सांय ६:३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच दिनांक २१ ऑक्टोबर रोजी गायिका बेला शेंडे यांचं पहाटे ५:३० पनवेल येथे आणि सारेगम फेम आर्या आंबेकर यांचं दिनांक २२ ऑक्टोबर रोजी सायं कामोठे याठिकाणी होणार आहे.
महाराष्ट्रात दिवाळी पहाटला कार्यक्रमाला सांस्कृतिक परंपरा आहे.
पनवेल महानगरातील श्रोत्यांनी या कार्यक्रमाच्या आनंद घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.








