Home महाराष्ट्र सावळे ग्रामस्थांच्या उपोषणास यश; जलजीवन मिशन कामास प्रारंभ

सावळे ग्रामस्थांच्या उपोषणास यश; जलजीवन मिशन कामास प्रारंभ

131

सावळे ग्रामस्थांच्या उपोषणास यश; जलजीवन मिशन कामास प्रारंभ

सावळे ग्रामस्थांच्या उपोषणास यश; जलजीवन मिशन कामास प्रारंभ

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

कर्जत, दि. १५ ऑक्टोबर (प्रतिनिधी): कर्जत तालुक्यातील सावळे गावातील महिला व ग्रामस्थांनी, पोलीस मित्र संघटनेच्या नेतृत्वाखाली केलेल्या उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. २०२२ पासून प्रलंबित असलेले जल जीवन मिशन योजनेचे काम अखेर सुरू करण्यात आले आहे. योजना पूर्ण होईपर्यंत ग्रामपंचायत तसेच राजिप ग्रामीण हेदवली व राजिप ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग, कर्जत तुर्तास सावळे गावातील महिलांना दररोज पाणीपुरवठा करणार आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.

ग्रामस्थ व महिलांनी गेल्या काही दिवसांपासून पाण्यासाठी आंदोलन छेडले होते. गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त होते. अखेर उपोषणाच्या दबावाखाली प्रशासनाने तातडीने पाऊले उचलून जलजीवन मिशनच्या कामास गती दिली आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत सावध राहण्याचे आवाहन केले. “मतदान वाया घालवू नका, पण ज्यांना निवडून देता ते जनतेच्या प्रश्नांवर मौन बाळगतात, अशा लबाड उमेदवारांना मत देऊ नका,” असे आवाहन करण्यात आले. तसेच, “नोटा” बटण दाबून भ्रष्ट व निष्क्रिय उमेदवारांविरोधात निषेध व्यक्त करा,* असेही ग्रामस्थांनी सांगितले.

कार्यकर्त्यांनी नमूद केले की, “अन्याय करणाऱ्यांपेक्षा अन्याय सहन करणारे आणि त्यावर मौन बाळगणारे अधिक दोषी ठरतात. भविष्यात अन्याय होऊ नये यासाठी सर्वांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.”

सावळे ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे अखेर पाण्याच्या समस्येवर तोडगा निघाला असून, उपोषणकर्त्यांनी जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंदुराष्ट्र, जय संविधान! अशा घोषणांनी समाधान व्यक्त केले.