Home महाराष्ट्र दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशेष उपाय — प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे बंद

दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशेष उपाय — प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे बंद

69

दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशेष उपाय — प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे बंद

दिवाळी आणि छठ पूजेसाठी विशेष उपाय — प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटे बंद

संदेश साळुंके
कर्जत रायगड प्रतिनिधी
९०१११९९३३३

दिवाळी आणि छठ पूजेसारख्या मोठ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने महत्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरळीत आणि सुरक्षित व्हावा, तसेच स्थानक परिसरात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेने काही प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर तात्पुरती बंदी लागू केली आहे.

ही बंदी १६ ऑक्टोबर ते २८ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत लागू राहणार असून, ती खालील प्रमुख स्थानकांवर असेल — छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT), दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT), ठाणे, कल्याण आणि पनवेल.

रेल्वे प्रशासनाने सांगितले की, हा निर्णय केवळ गर्दी नियमनासाठी असून प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेला आहे. स्थानकांवरील प्लॅटफॉर्म तिकीट बंदीमुळे फक्त अधिकृत प्रवासी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनाच स्थानक परिसरात प्रवेश मिळेल, त्यामुळे हालचालीत सुलभता येईल.

तथापि, रेल्वे मंडळाच्या निर्देशानुसार ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले तसेच सहाय्याची गरज असलेल्या महिला प्रवाशांना विशेष परवानगीने प्लॅटफॉर्म तिकीट दिले जाईल.

मध्य रेल्वेने सर्व प्रवाशांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला प्रवास वेळेआधी नियोजित करावा आणि उत्सवकाळात होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे अधिकाऱ्यांना सहकार्य करावे, ज्यामुळे प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर होईल.

हा आदेश मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी जारी केला असून, प्रसिद्धीपत्रकाचा प्र.प. क्रमांक २०२५/१०/२३ आहे.