दिवाळी सणाच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांनाच करावा लागलं
पाण्यासाठी आंदोलन.
कळंबोली भाजप चे सिडको कार्यालयावर धाबाबोल

कृष्णा गायकवाड
पनवेल ( प्रतिनिधी): गेल्या काही दिवसांपासून कळंबोली परिसरातील नागरिकांचे पाणी टंचाई मुळे हाल सुरू असून, नेमक्या दिवाळ सणासुदी नागरिकांच्या तोंडच पाणी पाळाल्याचं चित्र पहायला मिळतंय.
नुकतेच नावडे परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी पाणी प्रश्नाच्या मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता ही,घटना ताजी असताना पुनश्च सत्ताधाऱ्यांना पाणी प्रश्नामुळे मेटाकुटीला यावं लागतं, याचं आश्चर्य जनता व्यक्त करते आहे.
भाजप कळंबोली अध्यक्ष अमर पाटील यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालय येथे धरणे आंदोलन पार पडले. दोन दिवसांत पाणी पुरवठा पूर्ववत करण्याचं लेखी आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. तसं झाला नाही, तर आमच्या माता भगिनी त्यांना साड्या आणि बांगड्या घातल्या शिवाय राहणार नाहीत असे मतं यावेळी मीडिया वार्ता शी बोलताना पाटील यांनी म्हटलं.
या आंदोलनावेळी जिल्हा चिटणीस रवी पाटील, नगरसेवक बबन मुकादम, नगरसेविका प्रमिला पाटील, नगरसेवक रविंद्र भगत, सरचिटणीस दिलिप बिष्ट, महिला मोर्चा अध्यक्षा मोनिका महानवर, महिला मोर्चा सरचिटणीस सरस्वती कथारा, दुर्गा साहबानी, अपर्णा सरोज, युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक, युवा मोर्चा सरचिटणीस निशाण गिल, माजी जिल्हा सहकार सेल अध्यक्ष अशोक मोटे, उपाध्यक्ष मनोरंजनसिंह, सचिव विलास किते, निलेश भोईर, केशव यादव, अमर ठाकूर, दर्शन पाटील, प्रभाग अध्यक्ष राम महानवर, प्रकाश शेलार, घनश्याम शर्मा, विष्णू गायकवाड, संजीत सिंह, मनीष तिवारी , राम पांडे तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








