Home latest News अलिबाग मध्ये रायगङ जिल्हा साहीत्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…
अलिबाग मध्ये रायगङ जिल्हा साहीत्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…
साहीत्य दिंडीने दुमदुमला अलिबाग
अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्युरो चीफ
९४२०३२५९९३
अलिबाग:- मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहीत्य आणि संस्कृती मंडळ व कलारंग सांस्कृतिक सामाजिक संस्था अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच कोकण साहीत्य परीषद शाखा अलिबाग यांच्या सहकार्याने दिनांक 8 व 9 नोव्हेंबर 2025 रोजी भंडारी भवन , श्रीबाग येथे जिल्हा साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात होते .त्याचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला….
या निमित्ताने साहीत्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.ही दिंडीत कान्होजी आंग्रे समाधी स्थळ ते भंडारी भवन या मार्गावरून मराठी भाषेचा जयघोष करीत संपुर्ण अलिबाग शहरात भाषेचा जागर करण्यात आला…
मराठी साहित्याचा प्रचार , प्रसार व संवर्धन या उद्देशाने शासकीय अनुदानातून हे साहित्य संमेलन संपन्न होत असून उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी , गीतकार संमेलनाध्यक्ष अरुण म्हात्रे , मानसीताई दळवी माजी जिल्हापरिषद सदस्य यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वेळी भरत गावडे सदस्य महाराष्ट्र राज्य साहीत्य व संस्कृती मंडळ, मुंबई विठ्ठल कदम सदस्य महाराष्ट्र राज्य व संस्कृती मंडळ, अजित पवार जिल्हा ग्रंथालय अधिकारी , संजय गुंजाळ अध्यक्ष को.म.सा.प रायगड, गणेश कोळी जिल्हा प्रतिनीधी को. म.सा.प . तसेच नागेश कुलकर्णी, वैभव धनावडे , तपस्वी गोंधळी , विकास पाटील व तसेच मराठी प्राथमिक शाळा , महाविद्यालयीन विद्यार्थी …. आदी साहित्यिक संघटना व वाचक उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प वाणी यांनी केले , स्वागताध्यक्ष रमेश धनावडे यांच्या वतीने प्रसाद पाटील माजी सरकारी वकिल यांनी स्वागत केले असून सुजाता पाटील साहित्यिका यांनी आभार व्यक्त केले.संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन प्रतिम सुतार यांनी केले..
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक पाटील , रुपेश पाटील, महेश कवळे , विजय म्हात्रे , जयवंत वाणी हे अधिक परीश्रम घेत आहे. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा तसेच चर्चासत्र, परीसंवाद , मुलाखत , काव्य कट्टा , कथा वाचन , व्याख्यान, सांस्कृतिक आविष्कार असे साहित्यिक कार्यक्रम असून रायगड जिल्ह्यातील लेखक , कवी , साहित्यिकांनी संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे अवाहन कलारंग संस्थेचे अध्यक्ष प्रकल्प वाणी यांनी केले आहे.