Home latest News पुण्याहून दिवेआगर कोकणात येणाऱ्या पर्यटकांची थार ताम्हाणी घाटातील खोल दरीत कोसळली, सहा...

पुण्याहून दिवेआगर कोकणात येणाऱ्या पर्यटकांची थार ताम्हाणी घाटातील खोल दरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू

57

पुण्याहून दिवेआगर कोकणात येणाऱ्या पर्यटकांची थार ताम्हाणी घाटातील खोल दरीत कोसळली, सहा जणांचा मृत्यू

विश्वास गायकवाड
बोरघर / माणगाव प्रतिनिधी
९८२२५८०२३२

पुणे येथील सहा जीवलग मित्र थार मधून कोकणातील दिवेआगर येथे पर्यटनासाठी निघाले होते. वाटेत ताम्हिणी घाटातील एका अवघड वळणावर त्यांच्या वाहनाचे नियंत्रण सुटले आणि त्यांची थार तब्बल पाचशे फूट खोल दरीत कोसळली आणि भीषण अपघात झाला या अपघातात थार चा अक्षरशः चेंदामेंदा होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. या बाबत माणगांव पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.२८३/२०२५ भा. न्या. संहिता २०२३ चे कलम १०६,१२५(अ),१२५ (ब), २८१ सह मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ हा गुन्हा दि. १७/११/२०२५ रोजीचे रात्री ११.३० वा. पासुन दि.२०/११/२०२५ रोजी सकाळी ०९.०० वा.चे सुमारास घडलेला असुन दि.२०/११/२०२५ रोजी १७.२२ वाजता दाखल आहे.
सदर गुन्हयातील फिर्यादी विशाल सादु गोठे वय २८ वर्ष, व्यवसाय रिक्षा चालक रा. कोपरेगाव, उत्तमनगर, शिवणे, ता. हवेली, जि.पुणे यांचा भाउ साहील सादु गोठे वय- २४ वर्ष, व त्याचे सोबतचे मित्र २) पुनित सुधाकर शेट्टी वय २० वर्ष, ३) ओमकार सुनिल कोळी वय- १८ वर्ष, ४) शिवा अरूण माने वय १९ वर्ष, ५) महादेव कोळी, वय १८ वर्षे सर्व रा. कोपरेगांव, उत्तमनगर, शिवणे ता. हवेली जि.पुणे असे दिनांक १७/११/२०२५ रोजी रात्री ११.३० वाजताचे सुमारास महिद्रा थार गाडी नंबर एमएच १२/वाय एन ८००४ ने कोपरेगाव जि.पुणे येथुन कोकणामध्ये दिवेआगर येथे फिरण्यासाठी निघाले होते. त्यानंतर दिनांक १८/११/२०२५ रोजीचे सकाळपासुन फिर्यादी यांचे घरातील लोकांनी तसेच मयताचे नातेवाईकांनी त्यांचे मोबाईलवर संपर्क साधला असता सदर गुन्हयातील मयताचे दिनांक. १८/११/२०२५ रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यंत त्यांचे मोबाईलवर कॉल लागत होते. त्यानंतर यांतील मयताचे फोन लागत नसल्याने मयताचे नातेवाईक यांना त्यांचे विषयी चिंता लागलेली असल्याने फिर्यादी व मयताचे नातेवाईक मित्र परिवार असे दिनांक १९/११/२०२५ रोजी पहाटे ०१.०० वाजता कोपरेगाव पुणे येथुन फिर्यादी व त्यांचे मित्र परिवार त्यांचे सोबतचे मित्रांचा शोध घेण्यासाठी निघाले. त्यांनी ताम्हीणी घाट मार्गे त्यांचा शोध घेत रस्त्याचे आजुबाजुला पाहणी करीत पहाटे ०४.०० वाजेपर्यंत विळेभागाड एमआयडीसी पर्यत आले. परंतु रात्रीची वेळ असल्याने फिर्यादी व सोबतचे लोकांना फिर्यादी यांचा भाउ व त्याचेसोबतचे लोक व त्यांनी आणलेली थार गाडी दिसुन आली नाही. त्यानंतर ते माणगांव मार्गे दिवेआगर येथे रस्त्याचे आजुबाजुने पाहणी करत पोहचले. तेथे गेल्यावर त्यांनी दिवेआगर बिच तसेच दिवेआगर मधील सर्व रस्ते, हॉटेल, लॉज, फॉर्महाउस या ठिकाणी जावुन साहील गोठे व त्याचे सोबतचे मित्रांचा तसेच त्यांनी आणलेल्या थार गाडीचा शोध घेतला. परंतु ते कोठेही मिळुन आले नाहीत. म्हणुन यांतील मयत प्रथम चव्हाण याचे वडील शहाजी विलास चव्हाण यांनी त्यांचा मुलगा व त्याचे पाच मित्र हे मिसींग झाले बाबत दि.१९/११/२०२५ रोजी उत्तम नगर पोलीस ठाणे, पुणे शहर येथे तकार नोंद केली आहे. ती मनुष्य मिसींग रजि. नं.६८/२०२५ प्रमाणे दाखल आहे.
दिनांक. २०/११/२०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजल्यापासुन ताम्हीणी घाटामध्ये १) रेस्क्यु चॅरीटेबल ट्रस्ट पुणे, २) शेलार मामा रेस्क्यु टीम माणगाव ३) SVRSS रेस्क्यु टीम, कोलाड ४) साळुंखे रेस्क्यु टीम माणगाव तसेच माणगाव पोलीस ठाणे यांचे मदतीने व ड्रोन कॅमेराद्वारे यांतील मयतांचा व थार गाडीचा शोध घेतला असता सकाळी ०९.०० वाजण्याचे सुमारास ताम्हीणी घाटातील खोल दरीमध्ये मौजे सणसवाडी गांवचे हद्दीत झाडी झुडपात थार गाडी व मयतांचे सहा प्रेत मिळुन आल्याने मयताचे नातेवाईक यांना सदर प्रेत दाखविले. त्यांनी सदरचे प्रेत ओळखुन ते १) साहील सादु गोठे वय २४ वर्ष, २) प्रथम शहाजी चव्हाण वय-२२ वर्ष, ३) पुनित सुधाकर शेट्टी वय २० वर्ष, ४) ओमकार सुनिल कोळी वय १८ वर्ष, ५) शिवा अरूण माने वय १९ वर्ष, ६) महादेव कोळी, वय १८ वर्षे सर्व रा. कोपरेगांव शिवणे ता. हवेली जि. पुणे यांचे प्रेत असल्याचे ओळखले आहेत.सदरची कामगिरी मा.श्रीमती आंचल दलाल मॅडम, पोलीस अधिक्षक, मा.श्री. अभिजित शिवथरे सोो, मा.अपर पोलीस अधिक्षक रायगड, मा.श्री. पुष्कराज सुर्यवंशी सोो, उपविभागीय पोलीस अधिकारी माणगांव विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. निवृत्ती बो-हाडे पोलीस निरीक्षक, सपोनि/श्री. भैरु जाधव, मसपोनि/श्रीमती लाड, पोहवा/११०० वर्तक, पोहवा /१०१८ सानप, पोह/१५९९ शिंदे, पोशि/ २४०० तांदळे, पोह/१३३२ गायकवाड, पोह/११७४ तुणतुणे, पोशि/१३१२ रणवीर, पोशि/१२५० बांडे सर्व नेमणुक माणगांव पोलीस ठाणे यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा तपास सपोनि श्री. जाधव हे करीत आहेत.