Home latest News तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्ष दाखल विद्यार्थ्यांचं...

तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्ष दाखल विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ संपन्न

86

तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये प्रथम वर्ष दाखल विद्यार्थ्यांचं स्वागत समारंभ संपन्न

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

तळोजा: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त तळोजा फेज 2 येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये B.A.L.L.B., L.L.B., L.L.M. च्या प्रथम वर्षाच्या विदयार्थ्यांचे स्वागत समारंभ कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश मा.कोठलीकर , अलिबाग जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. पवार, पनवेल न्यायालयाचे सरकारी वकील ॲड. भोपी ,पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भुजबल ,बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. शिनगारे, बबनदादा पाटील कॉलेज ऑफ फिजओथेरेपीचे प्राचार्य डॉ. मनोज अग्निहोत्री, बबनदादा पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगचे प्राचार्य सौरभ खेडेकर , एस. व्ही. सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ.राहुल कांबळे , दि. इलाईट पब्लिक स्कूल स्टेट बोर्डचे प्राचार्या डॉ.अलका कळसी,
दि. इलाईट पब्लिक स्कूल C. B. S. E. शाळेच्या प्राचार्या डॉ. अर्थप्रिया काका, बी. के. पाटील ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य गोधळी सर, कै. कमलू पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. बोराटे सर, अ. बी. पाटील माध्यमिक वि‌द्यालयाचे प्राचार्य श्री. गोडबोले सर कॉलेजचे सर्व विदयार्थी प्राध्यापक, शिक्षक उपस्थित होते.

हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक . गणेश पाटील व संचालक कैलास पाटील, संचालक स्मित भोईर सेवानिवृत्त प्राचार्य काकेकरसर, उपस्थित होते.