Home E-Paper शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन बेदम मारहाण; खारघर जि.परिषद शाळेत घडला प्रकार 

शालेय विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन बेदम मारहाण; खारघर जि.परिषद शाळेत घडला प्रकार 

192

घरी सांगू नकोस म्हणून मुलीस शिक्षिकेकडुन दबाव

उमेश  दांडगे 

खारघर प्रतिनिधी 

98198 10561

खारघर: खारघर जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थीनीस शिक्षिकेकडुन बेदम मारहाण प्रकरण समोर आले आहे, याची माहिती मिळताच शिवसेनेकडून आक्रमक पवित्रा घेत या प्रकरणाची गंभीर दखल घेत,शाळा प्रशासनास जाब विचारत शिक्षिकेवर कार्यवाही करण्याची मागणी होत आहे.

   खारघर स्थित जिल्हा परीषद शाळेत २ दिवसांपूर्वी ६ वी च्या वर्गातील विद्यार्थीनी (वय ११ वर्ष )या मुलीस शाळेतील महीला शिक्षिका यांच्या कडून शिल्लक बाबी वरून बेदम मारहाण करण्यात आली यामुळे या मुलीच्या अंगावर वळ उमटले ,पंरतु हे घरी सांगू नको याकरीता मुलीस शिक्षिकेकडुन दबाव टाकून दम सुद्धा देण्यात आला. सदर बाब मुलीचे आई वडील यांना कळताच त्यांनी शिवसेना कार्यालयात धाव घेत न्यायासाठी विनंती केली. तातडीने मुलीच्या आई वडीलांसमवेत या विषयाचे गांभीर्य ओळखता शिवसेनेचे पदाधिकार्यासमवेत शाळेस भेट देऊन प्राध्यापक श्री सुनिल बडगेरे व शाळा प्रशासन यांच्या समोर सदर महीला शिक्षिकेस जाब विचारत या प्रकरणावर खडसावत त्यांच्या कडुन लेखी माफीनामा घेवून, यापुढे असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी शाळा प्रशासनास खबरदारी घ्यायच्या सुचना दिल्या , सदर विषयावर योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन यावेळी प्राध्यापकांकडुन देण्यात आले.

    यावेळी शिवसेना महानगरप्रमुख अवचित राऊत ,महानगर संघटक गुरुनाथ पाटील , उपशहर प्रमुख नंदु वारुंगसे , प्रशांत जांभुळकर , शाखा प्रमुख संतोष कटीमनी ,युवासेना शहर अधिकारी निखिल पानमंद , अश्विन ससाणे , आशुतोष जवळकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.