Home महाराष्ट्र महापारेषण मधील २२० केव्ही उलवे उपकेंद्रात दिवाळीसणा सोबत बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ...

महापारेषण मधील २२० केव्ही उलवे उपकेंद्रात दिवाळीसणा सोबत बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पडला पार.

303

महापारेषण मधील २२० केव्ही उलवे उपकेंद्रात दिवाळीसणा सोबत बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पडला पार.

महापारेषण मधील २२० केव्ही उलवे उपकेंद्रात दिवाळीसणा सोबत बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांचा निरोप समारंभ पडला पार.

कृष्णा गायकवाड
उलवे (प्रतिनिधी): महाराष्ट्रभर दिवाळी सण मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना महापारेषण पनवेल विभागातील 220 केवी उलवे (जी आय एस) उपकेंद्रात मोठ्या उत्साहात साजरा झाला. कर्मचाऱ्यांच्या केलेल्या कामाची एक कृतज्ञता म्हणून या सणाच्या निमित्ताने सर्व कार्यालयांमध्ये शुभेच्छा आणि भेटवस्तू देऊन साजरा केला जातो. विद्युत क्षेत्रात काम करत असताना हेच कर्मचारी जीवाची बाजी लावून आपल्या घरापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम करत असतात.
नुकत्याच पारेषण विभागामध्ये झालेल्या भरतीच्या निमित्ताने बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. हे कर्मचारी आता विविध ठिकाणी कार्यरत असून आपल्या विभागासाठी दिलेल्या योगदानाचं कृतज्ञता म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं असल्याचं उपकेंद्र प्रमुख प्रिया आर्या यांनी मीडिया वार्ताची बोलताना सांगितलं.

या कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक अभियंता मेघा शिंदे, सहाय्यक अभियंता साक्षी चौधरी, उपमुख्यतंत्रज्ञ योगेश तावडे, सहाय्यक तंत्रज्ञ वैष्णवी भालेराव, स्नेहल पडघम, धम्मपालिका ठोंबरे, तसेच बाह्यस्रोत कर्मचाऱ्यांमध्ये हर्षल गारवे, प्रितेश पाटील, विराज म्हात्रे, सारंग ठाकूर, मयुरी मिसाळ, निकेत गायकर, तेजस ठाकूर व सर्व सुरक्षा कर्मचारी उपस्थित होते.