Home महाराष्ट्र मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन महिलांच्या अनिमियासह २१...

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन महिलांच्या अनिमियासह २१ प्रकारच्या तपासण्या मोफत..

80

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

महिलांच्या अनिमियासह २१ प्रकारच्या तपासण्या मोफत..

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत महाआरोग्य शिबिराचे आयोजन

महिलांच्या अनिमियासह २१ प्रकारच्या तपासण्या मोफत..

म्हसळा: संतोष उद्धरकर.

म्हसळा:ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत गाणी यांनी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलुन प्राथमिक आरोग्य केंद्र वाळवटी, स्वदेस फाउंडेशन, आणि लक्ष्मी चारिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त पणे कोंढे तर्फे श्रीवर्धन येथे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत एका भव्य आणि ऐतिहासिक मोफत महाआरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या शिबिराला ग्रुप ग्रामपंचायत गाणी कार्यक्षेत्रातील ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
या शिबिराचे मुख्य आकर्षण म्हणजे २१ प्रकारच्या अत्यावश्यक आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत करण्यात आल्या असून विशेषतः ग्रामीण भागातील महिलांमध्ये आढळणाऱ्या अनियमिया (रक्तक्षय) तपासणीवर या शिबिरात विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. तपासण्यात आलेल्या मुख्य चाचण्यांमध्ये..रक्तदाब,रक्तातील साखर,नेत्र तपासणी,
ईसीजी,रक्ताक्षय सर्व प्रकारची रक्त तपासणी, सीबीसी (CBC), कोलेस्ट्रॉल, रक्ताक्षय (Sickle Cell) आणि एक्स-रे.
संप्रेरक तपासण्या म्हणून थायरॉईड (Thyroid) चाचणी.
या सर्व तपासण्यांमुळे अनेकांना आपल्या आरोग्याच्या गंभीर समस्यांचे निदान करुन ज्यामुळे संभाव्य धोके टाळता आले.
या शिबिराच्या आयोजनात स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची उपस्थिती प्रेरणादायी ठरली असुन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नारायणकर, डॉ. विशाखा यांनी आरोग्यसेवेचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी उपस्थित सरपंच आदित्य कासरुंग, उपसरपंच सुभाष उजळ, सदस्य,निखिल कदम, चांदणी कासरुंग, माजी सरपंच अनंत शिगवण,ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष रामचंद्र शिगवण आणि ग्रामपंचायत अधिकारी अभिजित माने यांनी पुढाकार घेतला. स्वदेस फाउंडेशनचे तालुका व्यवस्थापक नाथाजी कटरे, प्रल्हाद श्रीवर्धनकर, विस्तार अधिकारी आरोग्य अनंत गायकर, क्षयरोगतज्ञ विजय पाटील, महालॅब आणि लक्ष्मी चारिटेबलचे प्रतिनिधी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे आरोग्य साहायक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तसेच आशा सेविका नंदिनी कासरुंग, संजना कासरुंग आणि अंगणवाडी सेविका रजनी कासरुंग यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना शिबिरात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले.
सरपंच आदित्य कासरुंग यांनी ग्रामस्थांना आवाहन केले की, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. शासनाच्या या अभियानाचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपल्या आरोग्याबद्दल जागरूक राहावे.तसेच तालुका आरोग्य अधिकारी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ अंतर्गत ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यावर भर दिला.