Home महाराष्ट्र पनवेल मधील ओरायन मॉलने साकारला भव्य सिंधुदुर्ग किल्ला दिवाळीत लहानग्यांना दिला...

पनवेल मधील ओरायन मॉलने साकारला भव्य सिंधुदुर्ग किल्ला दिवाळीत लहानग्यांना दिला संस्कृती जपण्याचा धडा.

173

पनवेल मधील ओरायन मॉलने साकारला भव्य सिंधुदुर्ग किल्ला

दिवाळीत लहानग्यांना दिला संस्कृती जपण्याचा धडा.

पनवेल मधील ओरायन मॉलने साकारला भव्य सिंधुदुर्ग किल्ला

दिवाळीत लहानग्यांना दिला संस्कृती जपण्याचा धडा.

 

कृष्णा गायकवाड
तालुका प्रतिनिधी
9833534747

पनवेल: सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती पनवेल मधील ओरायन मॉलमध्ये साकारण्यात आली आहे. दिवाळीमध्ये किल्ले बनवण्याची परंपरा आजही ग्रामीण भागात लहानगे आणि तरुणाई जोपासत आहेत. शहरी भागातील ही परंपरा लोप पावत चालली असताना ओरायन मॉलने संस्कृती जपत, सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांमध्ये आपल्या संस्कृतीचा जागर व्हावा यासाठी आम्ही हा उपक्रम राबवल्याचे माहिती ,ओरियन मॉल चे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली.
दिवाळी सणानिमित्त शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची प्रतिकृती तयार करण्याच्या स्पर्धा बच्चे कंपनीमध्ये आजही पाहायला मिळते. हा भव्य देखावा पाहण्यासाठी ग्राहकांची एकच गर्दी ओरायन मॉलला पाहायला मिळते.