Home पालघर कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला : आमदार विनोद निकोले यांचा पुढाकार

कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला : आमदार विनोद निकोले यांचा पुढाकार

84

कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला : आमदार विनोद निकोले यांचा पुढाकार

कुर्झे धरण परिसर पुन्हा पर्यटकांसाठी खुला : आमदार विनोद निकोले यांचा पुढाकार

अरविंद बेंडगा
जिल्हा प्रतिनिधी, पालघर
7798185755

तलासरी :- १६ ऑक्टोबर :
तलासरी तालुक्यातील विरोळी नदीवरील कुर्झे धरण परिसर पुन्हा एकदा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. काही काळापूर्वी मुसळधार पावसामुळे सुरक्षा कारणास्तव धरण परिसर बंद ठेवण्यात आला होता. मात्र आमदार कॉ. विनोद निकोले यांच्या पुढाकाराने आणि पाहणी दौऱ्यानंतर हा परिसर पुन्हा खुला करण्यात आला आहे.
आमदार निकोले यांनी गुरुवारी धरण परिसराची पाहणी करून अधिकाऱ्यांना बोटिंग सुरू करण्याचा व परिसर सुशोभित करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले. या उपक्रमामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्थानिक नागरिकांनी आमदार निकोले यांच्या या पुढाकाराचे स्वागत केले. “धरण पुन्हा खुलं झाल्याने गावकऱ्यांना आणि पर्यटकांना एक चांगली विश्रांती व पर्यटनाची जागा मिळाली आहे,” असे ग्रामस्थांनी सांगितले.
या पाहणीदरम्यान माजी उपसभापती कॉ. नंदकुमार हाडळ, उपसरपंच कॉ. मारिया वाडू, ग्रामपंचायत सदस्य व धरण प्रकल्प अधिकारी उपस्थित होते. त्यांनी आमदारांना धरण परिसराची माहिती दिली आणि पुढील कामांबाबत चर्चा केली.