Home महाराष्ट्र सेवेत असताना नियमित बी.एड. धारकांना पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ? शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या...

सेवेत असताना नियमित बी.एड. धारकांना पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ? शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या पत्राला गटशिक्षणाधिकारी यांची दप्तर दिरंगाई!

105

सेवेत असताना नियमित बी.एड. धारकांना पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ?

शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या पत्राला गटशिक्षणाधिकारी यांची दप्तर दिरंगाई!

सेवेत असताना नियमित बी.एड. धारकांना पदोन्नती वेतनश्रेणीचा लाभ?

शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या पत्राला गटशिक्षणाधिकारी यांची दप्तर दिरंगाई!

जितेंद्र नागदेवते
सिंदेवाही प्रतिनिधी :-

शासनाव्दारे कोणतेही धोरण राबवितांना किंवा धोरणात्मक निर्णय घेतांना त्याबद्यल स्वयंस्पष्ट निर्धारीत केले जाते.परंतु शिक्षण विभागाकडून कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचे दिसून येते. एवढया मोठया गंभीर बाबीकडे पांघरुध घालण्यात आले आहे. शिक्षण विभागातील कर्मचारी व शिक्षणाधिकारी हे आस्थापनाचे कामे, कर्तव्ये करतात,पण कायद्याचा अभ्यास असला पाहीजे ही जबाबदारी ओळखत नाहीत असे दुर्दैवी विधान अशा प्रकरणी करणे भाग पडते.

बोगस पध्दतीने बि.एड. करणे हा गुन्हा आहेत, पण त्यांनतर बोगस पदवी प्रमाणपत्राचे आधारे पदविधर शिक्षक पदोन्नती देणे हा सुध्दा गंभीर गुन्हा असतो. खात्यामार्फत सुध्दा 15 दिवसात योग्य ती चौकशी करुन कारवाई करता येते.पण कायद्याचे किमान ज्ञान असावे लागते. फसवणाऱ्या व्यक्तिला 2007-2008 पासून वाढीव वेतन व भत्ते द्यावे लागते , पदोन्नती दिल्या जाते, आर्थिक फायदे द्यावे लागते ही बाब स्पष्ट करते की शिक्षण विभागाचे प्रशासनातील अज्ञानातून सरकारी पैशांचे वेगळया अर्थाने अपहरणच होते. संबंधितांना जबाबदार धरुन त्यांच्या कडून अशा रक्कमा वसूल करण्याची कारवाई होऊ शकेल एवढी ही बाब गंभीर आहे. सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यासकट सगळयाच क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना घटनात्मक तरतुदी व न्यायालयीन निर्णय व इतर कायदे लागू आहेत हे लक्षात घेण्याची गरज आहे. बोगस पदवी प्रमाणपत्राचे आधारे अनेक पदवीधरांना पदोन्नती मिळाल्यामूळे पात्रता धारण करणाऱ्या कर्मचा-यांवर अन्याय झाला आहे हे नाकारता येणार नाही. पात्रता धारण करणारे कर्मचा-याला जाणीवर्पूक डावलण्यात आल्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विहीत अर्हता प्राप्त नसलेल्या कर्मचाऱ्यांस पदोन्नती देणे ही बाब निश्चितच अवैध ठरते. असा कर्मचारी त्याच्या मूळच्या पदावर पदावनतीने नेमण्यास पात्र ठरतो.
शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी क्रमांक/शिक्षण वि.(प्रा.)/आस्था-3 (3)//846/ दिनांक 13/10/2025 पत्र निर्गमित करून,’ नागपूर विभागातंर्गत कार्यरत शिक्षकांने अवैधरित्या नियमित डी.एड. किंवा बी.एड. केल्यास त्यांचेवर कारवाई न केल्यामुळे सबंधीत शिक्षणाधिकारी तसेच मुख्याध्यापकांवर कारवाई करणेबाबत विषयाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यापूर्वी मा. शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूर यांचे दिनांक 17 जुलै 2025 व 25 आगस्ट 2025 च्या संदर्भिय पत्रानुसार दिनांक 04/07/2025 व 1626/2025 दिनांक 08/09/2025 नुसार चौकशी अहवाल तीन दिवसांत पाठविण्याचे आदेश दिले होते परंतु गटशिक्षणाधिकारी यांनी केराची टोपली दाखवली आणि लबाडी साठी प्रलंबित ठेवले.असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही.
दिनांक 13/10/2025 च्या पत्रातील मजकूर ” कार्यरत शिक्षकांने बी.एड. केल्यास एकाच वेळेस दोन आस्थापनेवर ठिकाणी हजर राहिलेल्या शिक्षकांचे बी.एड. या कार्यालयाव्दारे यापुर्वी सुध्दा अमान्य करुन त्यांना बी.एड. चे लाभ नाकारण्यात आले आहे. तसेच शिक्षकांनी शाळेत नियमित कार्यरत असतांना बी.एड. चे उच्च शिक्षण प्राप्त केलेले आहे. शासनाने ठरवुन दिलेल्या मुक्त विद्यापिठा व्यातिरिक्त अन्य कोणत्याही महाराष्ट्र तसेच महाराष्ट्राबाहेरील विद्यापीठातून बी.एड. चे शिक्षण पुर्ण केले आहे जे अवैद्य ठरते त्यामुळे त्याला मान्यता/ लाभ येत नाही. अशा प्रकारे सेवेत राहुन नियमित बी.एड. केलेल्या शिक्षकांवर त्यांचे बी.एड. अमान्य करण्यात यावे व त्याला लाभ घेतल्यास वेतनातून वसुल करण्यात यावे व याबाबत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याबाबत प्राप्त पत्रात नमुद केलेले होते.परंतु अदयापही आपणाकडुन कोणत्याही शिक्षकांचा अहवाल या कार्यालयास प्राप्त झालेला नाही.
‘ सदर बाब कार्यालयीन शिस्तीला अनुसरुन नाही. तरी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता तात्काळ विनाविलंब माहितीसह अहवाल चौकशी करुन आपले स्वयंस्टष्ट अहवालासह या कार्यालयास सादर करण्यात यावा. जेणेकरुन सदर प्रकरणी अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करणे सोईचे होईल. विलंब होणार नाही याची नोंद घ्यावी. अन्यथा होणा-या विलंबास सर्वस्वी जबाबदारी आपली राहील.’असे कडक निर्देश दिले आहेत.स्वयंस्पष्ट अहवाल प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषद चंद्रपूर कडून कारवाई संबंधाने दखल घेऊन, कारवाई केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोट- ” जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत सेवेत असताना शिक्षकांनी नियमित बी.एड.दोन्ही ठिकाणी उपस्थित अभ्यासक्रम पूर्ण केल्याने, शासनाची फसवणूक करून, प्रतिमा समाजात मालिन केली आहे. काही शिक्षकांची चौकशी करून, अंतिम निर्णय होऊन सुद्धा प्रशासनाने जाणीवपूर्वक संरक्षण दिले आहे.कायद्याच उल्लंघन व नियमांची पायमल्ली झाल्याने असे कर्मचारी त्याच्या मूळच्या पदावर पदावनतीने नेमण्यास पात्र ठरतो.” – सागर शंभरकर जिल्हाध्यक्ष स्वतंत्र समता शिक्षक संघटना जिल्हा चंद्रपूर