Home महाराष्ट्र शेतकरी कामगार पक्षाच्या राजेंद्र पाटीलांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक...

शेतकरी कामगार पक्षाच्या राजेंद्र पाटीलांवर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक (एट्रोसिटी )गुन्हा दाखल

140

पनवेल (प्रतिनिधी): प्रकल्पग्रस्तांचे लोकनेते दि. बा. पाटील यांचे चिरंजीव अतुल दि. बा. पाटील यांच्यावर खालच्या पातळीत टीका करणाऱ्या तसेच नामदेव गायकवाड गुरुजी यांना जातीवाचक शब्दांनी अपमानित केल्याबद्दल शेकापच्या राजेंद्र पाटीलांवर अखेर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमनुसार उलवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
विमानतळाचे उदघाटन झाल्यानंतर राजेंद्र पाटील यांनी लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल दि.बा. पाटील यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली होती. त्यामुळे राजेंद्र पाटील यांच्यावर भूमिपुत्रांमध्ये नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या, याच विमानतळाच्या अनुषंगाने बौद्ध समाजाचे नामदेव गायकवाड गुरुजी यांनी विमानतळबाधित पुनर्वसन या विषयावर खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. मात्र राजेंद्र पाटील यांनी मुलाखतीचा संदर्भ देत गायकवाड गुरुजींविषयी अपमानास्पद वक्तव्य केले होते. या प्रकरणी एट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने राजेंद्र पाटील यांच्यावर उलवा पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम १९८९ कलम ३(१) (आर ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.