अंकुर नर्सरी (प्री स्कूल ) येथे दिवाळी पणत्या मेकिंग स्पर्धा संपन्न झाली.

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५
अंकुर नर्सरी येथील शाळेमध्ये लहान मुलांच्या पणत्या मेकिंग स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला या शाळेमध्ये प्रत्येक सणाला विविध स्पर्धा आयोजित करण्यात येतात मुलांना सणांची ओळख व त्याचे महत्त्व याविषयी आवड निर्माण व्हावी हा त्यांचा उद्देश असतो. यासाठी शाळेचे संचालक सौ नयना माळवदे , श्री. प्रभाकर माळवदे सोबत त्यांचा शिक्षक वृंद यासाठी मेहनत घेतात त्यांनी ही संस्था चांगल्या पद्धतीने चालू ठेवली आहे
यावर्षी दिवाळीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी पणत्या तयार करण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्याला चांगला प्रतिसाद विद्यार्थी व पालका कडून मिळाला.
श्री प्रभाकर माळवदे हे दरवर्षी एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार करतात त्यासाठी ते खूप परिश्रम घेतात देखावा नयनरम्य असतो ते स्वतः एक इंजिनियर असल्यामुळे चल देखावा चांगल्या प्रकारे सादर करतात.








