Home अलिबाग ग्राम पंचायत चेंढरे आयोजित दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची स्पर्धा

ग्राम पंचायत चेंढरे आयोजित दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची स्पर्धा

395

ग्राम पंचायत चेंढरे आयोजित दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची स्पर्धा .

ग्राम पंचायत चेंढरे आयोजित दिवाळीनिमित्त किल्ला बनवण्याची स्पर्धा

भागवत जाधव
अलिबाग
८८०५०२२५६५

सौ प्रणिता प्रल्हाद म्हात्रे, माजी उपसरपंच चेंढरे. यांच्यामार्फत कळविण्यात येत आहे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी चेंढरे हद्दीतील लहान थोर स्त्री-पुरुष अशा सर्व नागरिकांसाठी दिवाळी निमित्त किल्ला बनविण्याची स्पर्धा आयोजित केली आहे. यामागील उद्देश ऐतिहासिक कर्तुत्वाची साक्ष देणाऱ्या गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन व स्वच्छता याविषयी जागरूकता व्हावी यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्यासाठी सौ प्रणिता प्रल्हाद म्हात्रे यांच्यामार्फत जाहीर आव्हान केले आहे. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सुंदर बक्षीस देण्यात येतील यामध्ये पहिला दुसरा, तिसरा, क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षीस दिले जातील.

*स्पर्धेचे नियम व अटी*
१. सहभागी स्पर्धक चेंढरे ग्रामपंचायत हद्दीतील असावा.
२. जास्तीत जास्त इकोफ्रेंडली वस्तूंचा वापर परीक्षणात विचारात घेतला जाईल.
३. आपण तयार केलेल्या किल्ल्याचा केवळ एकच सुस्पष्ट फोटो *9373713264 / 8237766056* या वॉट्सअप क्रमांकावर स्पर्धकाचे पूर्ण नाव,पत्ता ,फोन नंबरसहित दिनांक २२/१०/२०२५पर्यंत पाठवायचा आहे.
४. स्पर्धेच्या नियमात बदल करणे, त्या रद्द करणे यासंदर्भातील सर्व हक्क आयोजकांनी राखून ठेवले आहेत.

आयोजक,
सौ प्रणिता प्रल्हाद म्हात्रे
*82377 66056*
माजी उपसरपंच,
ग्रामपंचायत चेंढरे,
ता अलिबाग