Home अलिबाग पत्रकार मारहाण प्रकरणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी

पत्रकार मारहाण प्रकरणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी

117

पत्रकार मारहाण प्रकरणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी

पत्रकार मारहाण प्रकरणी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील दोषी

अँड.रत्नाकर पाटील
रायगड ब्यूरो चीफ
९४२०३२५९९३

अलिबाग:
२०१९ च्या लोकसभा मतमोजणीदरम्यान लोकसत्ताचे पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या शेकाप सरचिटणीस आणि माजी आमदार जयंत पाटील यांना अखेर अलिबागच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सहा वर्ष चाललेल्या सुनावणीनंतर शुक्रवारी न्यायालयाने पाटील यांना भारतीय दंड विधान कलम ३२३ अंतर्गत दोषी ठरवत एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र आणि पाच हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचा आदेश दिला आहे.

२४ मे २०१९ रोजी लोकसभा मतमोजणी सुरू होती.
अलिबागच्या मतमोजणी केंद्रातच जयंत पाटील यांनी पत्रकार हर्षद कशाळकर यांच्यावर “तुम्ही पत्रकार काही बातम्या छापता” असे म्हणत थेट हल्ला केला. या घटनेनंतर अलिबाग पोलीस ठाण्यात
माजी आमदार जयंत पाटील, पंडीत उर्फ सुभाष पाटील आणि अभिजित कडवे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेनंतर तातडीने अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक के. डी. कोल्हे यांनी चौकशी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायदंडाधिकारी श्रीमती एम. बी. अत्तार यांच्या न्यायालयात झाली. फिर्यादी, पंच, तपासिक अधिकारी आणि एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. सर्व साक्षी आणि पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने पाटील यांना दोषी ठरवले

न्यायालयाने पाटील यांना तुरुंगात न पाठवता, अपराध प्रतिबंधक कायद्यानुसार एक वर्ष चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र सादर करण्याचे आणि पत्रकारास ५ हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले.
गेली सहा वर्षे हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित होते. सरकारी पक्षात प्रसाद पाटील, कविता परिट आणि नईमा घट्टे यांनी न्यायालयीन लढाईत महत्त्वाची भूमिका बजावली. अखेर पत्रकारावर झालेल्या हल्ल्याला न्यायालयाने ‘हल्ला नव्हे, अपराध’ असा शिक्का मारत दोषी ठरवले.
पत्रकारांवर हल्ला केल्याने काय परिणाम होऊ शकतात या प्रकरणी न्यायालयाने आरसा दाखवला आहे. ही शिक्षा छोटी असली तरी संदेश मोठा असल्याचे बोलले जाते.